शेडगावच्या उपसरपंच पदी रुपाली अमोल झेंडे यांची बिनविरोध निवड.
श्रीगोंदा प्रतिनिधी:- तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रुपाली अमोल झेंडे यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच जयश्री भुजबळ यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवार (दि.७) रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचमंगल शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली.
यावेळी उपसरपंच पदासाठी रुपाली अमोल झेंडे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने रुपाली झेंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून विजय रसाळ यांनी स्वाक्षरी केली. अनुमोदन शाहूराजे भोपळे यांनी सही केली यावेळी ग्रामपंचायत सरपंच मंगल शेंडे ग्रामपंचायत सदस्य संध्या शेंडे, सोनाली भदे, पार्वती गवळी, विलास रणसिंग, जयश्री भुजबळ, शाहूराजे भोपळे, विजय रसाळ यांच्यासह माजी सरपंच विजय शेंडे, भीमराव बेलेकर, धनराज भोपळे, लिंबाजी रसाळ, महेंद्र रणसिंग, प्रसाद भदे, शिवाजी भदे उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली झेंडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीत रुपाली झेंडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी उपसरपंच रुपाली झेंडे यांचा सत्कार करत पुढील वातचलीसाठो शुभेच्छा दिल्या आहेत. रमेश गिरमकर सुनील गिरमकर महेश गिरमकर हरदास शिर्के गणेश झिटे सुशील कुमार शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध स्तरातील अधिकारी पदाधिकारी व शेडगाव ग्रामस्थ यांच्याकडून उपसरपंच रुपाली झेंडे यांचेवर अभिनंदन वर्षाव होताना दिसत करण्यात आला.
उपसरपंच पदाचा मान श्रीगोंदा तालुक्यात धडाडीचे पत्रकार म्हणून ओळख असलेले अमोल झेंडे यांच्या पत्नी रुपाली झेंडे यांना शेडगावच्या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाचा मान मिळाल्याने पत्रकारांसह सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतात ते दिसत असतो होता.