डिझेल चोर यांचा सुळसुळाट! हादरले दहीगाव साकत चोरीने व्यावसायिक त्रस्त पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका निभावनारे नागरिकांची सुरक्षा कोण करणार ?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार १४ जानेवारी २०२६
मुख्य संपादक:
अहिल्यानगर:दहीगाव साकत रुइछत्तीशी, वाटेफळ,शिरढोण ,मधील हॉटेल वरती लाइन गाड्यांच्या टाकीतून रात्रीच्या वेळेस कायम चोरी होत असल्याने भुरट्या चोरांची टोळी न भिता चोरी हि करते यांना कोणा अधिकारी व्यक्तीचा साथ मिळत आहे का पोलिस प्रशासनाचा वचक संपला म्हणले तरी चालेल
या चोऱ्या गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक गाड्यांच्या टाकीतून डिझेल चोर चोरी करून फरार होतात तर काही ठिकाणी कॅमेऱ्यात तोंडे बांधून रेकॉर्डिंग होऊन सुद्धा डिझेल चोरांची टोळी भय न बाळगता चोरी करत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तातडीने भुरट्या चोरांची टोळी वरती पकडून कारवाई करावी हि स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे. माल वाहू गाड्या रात्रीच्या वेळी दहीगाव साकतवाहन चालक विश्रांतीसाठी झोपी गेल्याने गाडीच्या आडे आडोसा धरून गाडीच्या टाकीतला डिझेल काढून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला .
हे चोर रात्रीत पाच गाडीची चोरी करत असल्याबाबत हॉटेल चालक गाडी चाल काकडून सांगण्यात आले. व्यवसाय डिझेल चोरीने बंद होण्याच्या मार्गावर वाहतूक गाड्या बंद नगर सोलापूर रोडवरती डिझेल भीतीचे सावट सुरू असल्या कारणाने गाडी मुक्कामी नको हॉटेल झाले मोकळे व्यावसायिक त्रस्त. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याबाबत हॉटेल चालकांकडून सांगण्यात आले. डिझेल चोरी साठी वापरली जाणारी वाहने स्विफ्ट, स्कॉर्पिओ,व संगे बाळगली जाणारी हत्यारे, गावठी बंदूक, धारदार कोयता, या हत्याराचा भयाने हॉटेल मालक, चालक भयभीत झालेले दिसून आले. प्रशासनाकडून संरक्षण न होण्याबाबत खंत व्यक्त करण्यात आला.
सदर बातमी माहिती देणारी विकास धनगर, दत्तू पवार, अजय धनगर, आकाश धनगर, सोमनाथ पवार, प्रवीण पवार, सागर कोळेकर,
🔴🟢🟠🟣
