CM Devendra Fadnavis On Priyank Kharge Letter:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरुन एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागेत आरएसएसच्या कार्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रियांक खरगेंच्या मागणीवरुन भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रियांक खरगेंचे वक्तव्य हे प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांमध्ये शाखा आणि बैठका आयोजित करून मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये फूट पाडणारे विचार पसरवत असल्याचे मंत्री प्रियांक खरगे यांनी म्हटलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना संविधानाच्या तत्वांविरुद्ध काम करतोय आणि तिचे कार्यकर्ते मुलं आणि तरुणांमध्ये अशांतता पसरवत आहेत, ज्यामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येत असल्याचे प्रियांक खरगे यांनी म्हटलं. प्रियांक खरगे यांच्या पत्रानंतर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत
