अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये काही ज्युनियर्स त्यांची हुशारी दाखवणार आहेत. केबीसी ज्युनियर सुरू झालं असून अतिशय हुशार असलेली छोटी मुलं हॉटसीटवर बसताना दिसत आहेत. त्यांच्या हुशारीने बिग बी आश्चर्यचकित झाले. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एका भागात गुजरातचा इशित भट्ट सहभागी झाला होता. पण, वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
