श्रीगोंदा प्रतिनिधी:मागील काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहुचर्चित कापूस व्यापारी अपहरण व खंडणी प्रकरण गाजले होते. त्यातील व्यापारी प्रशांत मते राहणार शिर्डी हा आता मोठा घोटाळ्यात सापडण्याची शक्यता आहे.
श्रीगोंदा:टाकळी लोणार येथील शेतकरी गणेश खेडकर यांनी 600 पानांच्या पुराव्यानिशी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे व्यापारी व इतर सहकारी यांच्या विरोधात दिनांक ०३/१०/२०२५ तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित व्यापारी मते यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी कापसाचे गोडाऊन भाड्याने घेऊन मोठमोठे भ्रष्टाचार अत्यंत हुशारीने केले आहे.✒️
✒️काही दिवसांपूर्वी हा फिर्यादी असलेला व्यापारी आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. सदर कापूस व्यापारी याच्या विरोधात सर्व पुरावे पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहेत. तसेच त्याने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मधून करोडो रुपयांच्या मालाच्या पावत्या काढलेल्या समोर आल्या आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड चर्चा रंगल्या व पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेश खेडकर यांच्याकडून सांगण्यात आले 🔴🟢🟣🟠
