महाराज कॉलेज ॲथलेटिक्स खेळाडूं रोहन चव्हाण व ओम तोडकर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी
दिनांक 0७ व 0८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवरा पब्लिक स्कूल प्रवारानगर ता.राहता येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. त्यामधे रोहन चव्हाण याने १०० मीटर रनिंग मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत त्याची बालेवाडी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
व ओम तोडकर याने थाळीफेक मध्ये जिल्हा स्तरावरती तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ४*४०० रिले संघातील खेळाडू साहिल चव्हाण, साद शेख, रोहन चव्हाण, सुजल दरेकर व ओंकार औटी त्यांनीही आपला चांगला खेळ दाखविला..
सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पाठवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ.सुदाम भुजबळ, डॉ.नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, जिमखाना प्रमुख प्रा.रमेश थोरात व प्रा. श्रीकांत थोरात, विभाग प्रमुख प्रा. रमेश भुजबळ, प्रा.उषा बोरुडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय डफळ, क्रीडा संचालिका कल्पना बागुल, कोच धोपावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
