प्राथमिक शाळेत पालक मेळावा- कामांचा पाऊस…..
श्रीगोंदा प्रतिनिधी:श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोड गणपती मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेहेत्रे वस्ती येथील बदलून गेलेल्या
वाळुंज मॅडम, शेलार सर,श्रीमती गांगर्डे मॅडम या शिक्षकांचा निरोप समारंभ व नवीन हजर झालेले नलगे सर, कदम सर आणि श्रीमती विटेकर मॅडम या
शिक्षकांचा सन्मान व स्वागत करीत शाळा व्यवस्थापक समितीच्या वतीने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मी या मेळाव्यामध्ये शाळेच्या भवितव्यासाठी व शाळेमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सोयी सुविधा कशा मिळतील यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये नवीन व जुन्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला व समितीच्या वतीने सर्व पालकांची व शिक्षकांची ओळख करून देण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे व पालकांचे मनोगते घेण्यात आली त्यामध्ये शाळेमध्ये कोण कोण देणार असे व्यवस्थापक समितीच्या वतीने मान्यवरांना विनंती करण्यात आली त्या विनंतीला मान देऊन समाजसेवक एड.सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीने शाळेला कॉम्प्युटर प्रिंटर भेट देण्यात आली त्याचबरोबर शाळेमध्ये मुरूम व लाल माती ग्राउंड साठी देण्यात आली आहे. शाळेला रंगकाम व सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी समाजसेवक सुशील कुमार शिंदे बापूशेठ माने वैभवशेठ मेहता यांच्यावतीने दोन दिवसात देणार असे शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केले. व्हाईट बोर्ड योगेश निकम यांनी तर स्टेजवरील शेड सुरेश आबा आळेकर यांच्या वतीने तर मैदानावर पेविंग ब्लॉक नगरसेवीका सुनिता खेतमाळीस, नगरसेवक अंबादास औटी,संग्राम घोडके या थोर देणगीदारांचे उपस्थितांच्या वतीने आभार मानण्यात आले.
अध्यक्षस्थानी गोरख भाऊ दांडेकर तसेच प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी वाजे मॅडम व केंद्रप्रमुख आढाव साहेब सर्व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित नगरसेवक, पत्रकार बंधू ,तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ,शिक्षण प्रेमी नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मेळाव्याची सुरुवात सुंदर शालेय परिपाठ ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर शाळेच्या गुणवत्तेबाबत व शाळेच्या भौतिक सुविधा बाबत खालील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली ज्यामध्ये मैदानावर प्लेविन ब्लॉक,कॉम्प्युटर ,प्रिंटर,व्हाईटबोर्ड, शाळेसाठी नवीन वर्गखोल्या शाळेची दुरुस्ती,शाळा रंगकाम, परिपाठासाठी स्टेजवर नवीन शेड,मैदानासाठी लाल माती,सीसीटीव्ही कॅमेरे,इंटरएक्टिव्ह
अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी नगरसेवक गणेश भोस,संजय खेतमाळीस,वैभव मेथा, सुरेश आळेकर,दादा गनीशे, पत्रकार नितीन रोही, संदीप आळेकर, मारुती दांडेकर, कांतीलाल दांडेकर, मशरूम उद्योजक सचिन रोही, संभाजी आळेकर, हॉटेल शिवशाही चे सतिष आळेकर, राहुल गणीशे यांच्यासह शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व पालक विद्यार्थी- विद्यार्थिनी मान्यवर होते तर कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित मान्यवरांना व विद्यार्थ्यांना समाजसेवक एड.सुशील भाऊ शिंदे यांच्याकडून अल्पहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष संतोष पोकळे यांनी केले.तर आभार अध्यक्ष प्रशांत खेतमाळीस यांनी मानले
