आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पक्ष मित्र संतोष शिंदे यांनी दिलदार कामगिरी दाखवली
तालुका प्रतिनिधी:दि.गुरुवार १६/१०/२०२५ रोजी दुपारी २ वाजता तांदळी दुमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर तांदळी गावामध्ये वडाच्या झाडावरून वन्यजीव दुर्मिळ राखी बगळा झाडावरून पडल्यामुळे त्या बगळ्याच्या पायाला जखम होऊन त्यामधून रक्त वाहत होते. हि माहिती काही मुलांनी सांगितली त्यामुळे त्या पक्षाला मी घरी घेऊन आलो. त्या पक्षाला उडता येत नव्हते आणि पक्षी उडण्यासाठी धडपड करत होता. हे पाहून मांजरा सारखे प्राणी किंवा कुत्र्यासारखे प्राणी त्या वन्यजीव प्राण्यावर हल्ला करून त्या पक्षाचा जीव मारण्याचा प्रयत्न केला.
असता परंतु या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी त्या पक्षाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पक्षी झाडावरून पडल्यामुळे घाबरलेला होता घाबरलेला असल्यामुळे त्या पक्षाला शांत झाल्यानंतर उचलून घेतले. व घरी घेऊन गेलो घरी नेल्यानंतर त्या पक्षाच्या पायाला जी जखम झाली होती त्या जखमेवर मलमपट्टी केली. वन्यजीव पक्षाला जखमी होऊन पडल्यामुळे त्याला पुढील उपचाराची गरज असल्यामुळे वन्यजीव रक्षक अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे मी वैभव हराळ सह संघर्ष नामा मल्टीमीडियाचे संपादक मेजर भीमराव ऊल्हारे साहेब यांना फोन करून सर्व माहिती सांगितली.
त्यानंतर मेजर साहेबांनी वन्यजीव रक्षक अधिकारी काळेसाहेब यांना फोन करून सांगितल्यानंतर काळे साहेबांनी त्यांचे कर्मचारी पाठवून राखी बगळा नावाचा पक्षी ताब्यात घेतला व त्या पक्षाला रेस्क्यू करतो असे सांगून रेस्क्यू अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन त्या पक्षावर उपचार करून नंतर त्या वन्यजीव पक्षास निसर्गामध्ये सोडून देऊ असे सांगितले. काही महिन्यापूर्वी असेच एक वन्य जीव प्राणी जखमी झाला असता वन्यजीव रक्षक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तो प्राणी वन्यजीव रक्षक अधिकारी यांच्याकडे स्वाधीन केला होता.
