राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राचार्य बी टी मखरे यांना प्रदान
श्रीगोंदा माधव बनसुडे :- – महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक व उच्च मुख्याध्यापक महामंडळ मुंबई तर्फे दिला जाणारा सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतनच्या मुरलीधर (आण्णा) होनराव व एन एस गुळवे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बी टी मखरे सर यांना कराड येथे आयोजित केलेल्या ६४ वे वार्षिक अधिवेशनात कोकण विभागाचे शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श आमदार ज्ञानेश्वर (माऊली) म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्राचार्य बी टी मखरे सर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान त्याच बरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासन स्तरावर केलेले प्रयत्न याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.श्रीगोंदा तालुक्यातील हा पहिलाच पुरस्कार म्हणावा लागेल.
या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी सुभाष माने, अनिल पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे,अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, धुमाळ सर, श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील भोर, शिवाजी गवळी, सुभाष जामदार, आप्पासाहेब वागस्कर, प्राचार्य शहाजी मखरे, संघर्ष कन्या कल्पना वाळके -मखरे यांच्या समवेत हा पुरस्कार देण्यात आला.प्राचार्य मखरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष प्रा.दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ अशोक खेंडके, खजिनदार प्रा.ज्ञानदेव गायकवाड, संस्था विश्वस्त अशोक होनराव,प्रा. डॉ.बाळासाहेब बळे, राजेंद्र गुळवे, लालासाहेब फाळके, मुख्याध्यापिका संगिता वनपुरे, एन एस गुळवे ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.कांचन कुरुमकर, विजय काटे, ज्ञानेश्वर चाकणे डॉ.नानासाहेब कुरुमकर, शरद महाराज वाबळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरीप्रा.राम सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.
