मावळा प्रतिष्ठाणच्या किल्ले बनवा स्पर्धेत रुद्र शिंदेचा मल्हारगड प्रथम
श्रीगोंदा माधव बनसुडे :- तालुक्यातील मढेवडगाव येथील मावळा प्रतिष्ठान वतीने आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत जि.प. उंडेमळा शाळेतील रुद महेश शिंदे याने बनवलेल्या मल्हारगडाच्य प्रतिकृतीस त्याने इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक पटकावला. तर इयत्ता तिसरीत अस्मिता प्रदिप उंडे हिने बनवलेल्या ‘ विजयदुर्ग ‘ प्रतिकृतीस प्रथम क्रमांक मिळवला. तसेच हर्षल मनोज सुपेकर याच्या जंजिरा व लोकेश नववाथ शिंदे याच्या शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीस त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला .
तसेच जीवन दिपक पवार याच्या तोरणागड व मृणाली संदिप जगताप हिच्या जंजीरा किल्याच्या प्रतिकृतीस त्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.. तसेच शंभूराजे मोहन गायकवाड व शिवम किशोर मांडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. विजेत्यांना मावळा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोरखराजे उंडे यांच्या वतीने शिवजयंतीस सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम प्रतिष्ठाणच्या वतीने शाळेत राबविण्यात येत आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच राजकुमार उंडे तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
