श्रीगोंदा नगरपालिकेत आता गोरख आळेकर यांची शहर विकास आघाडी
श्रीगोंदा माधव बनसुडे :- श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक आचार सहिंता लागल्यापासून चांगल्याच घडामोडी घडत आहे त्यातच आज शहरातील नगर पालिका, शहरातील मतदार आणि शहरातील नागरिकांना अधिकार नाही का आमचा उमेदवार कोण ठरवायचा?
आम्हाला आज पर्यंत आमच्या शहरातील निवडणुकीला काष्टी, वांगदारी, घोगरगाव, पिंपळगाव पिसा यांचे उंबरे झीजवावे लागते तेव्हा आमच्या शहरातील उमेदवाराला उमेदवारी मिळते. ते पण तो त्या नेत्याचा गुलाम असेल तरच उमेदवारी मिळते किंवा त्याने नेत्यांची झोळी भरली की उमेदवारी अशीच प्रथा परंपरा आतां पर्यंत चालू आहे. या नेत्यांना शहराच्या विकासाचे काहीच घेणे देणे नाही फक्त या पैसे कमविणे हाच एकमेव उद्देश असणाऱ्या नेत्याकडून शहराच्या विकासाची कोणती अपेक्षा जनतेने ठेवावी.
श्रीगोंदा नगर परिषद च्या निवडणुकीत शहर विकास आघाडी करण्याची चर्चा असताना काल बैठकीत बोलले की शहर विकास आघाडी करू नये. आमच्या शहराची निवडणूक आम्ही करायची की नाही हे तुम्ही आम्हाला सांगणार? आम्ही कोणाचे गुलाम नाही त्यामुळे तुम्ही हा सल्ला तुमचे जे कोणी गुलाम असतील त्यांना द्या आम्हला नको. आम्ही ही निवडणूक जात धर्मापालीकडं जाऊन विकास या मुद्यावर करणार आहे.
या निवडणुकीत आम्ही 22 जागा आणि नगराध्यक्ष असा संपूर्ण पॅनल बनवत आहे. जे नेत्यांचे गुलाम नसतील तरुण तडफदार शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यानी संपर्क करा असे शहर विकास आघाडीचे मार्गदर्शक गोरख आळेकर यांनी व्यक्त केले…
