प्रभाग क्रमांक ०८ मधून सौ. अपेक्षा किरण मखरे यांची फिक्स नगरसेवक पदासाठी दावेदार
विश्व निर्माता। श्रीगोंदा
दि. ०९ नोव्हेंबर २०२५
सामाजिक न्यायाच्या लढ्यातून राजकारणात पाऊल, निवडणूक लढविण्याचे संकेत
श्रीगोंदा प्रतिनिधी:सामाजिक न्याय, हक्क आणि सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी नेहमीच आवाज उठवणाऱ्या यांच्या कन्या सौ. यांनी श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०८ मधून नगरसेवक पदासाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे. तरुणाईतील उत्साह, सामाजिक भान आणि परिवर्तनाची उमेद यांचा संगम असलेली प्रतीक्षा जगधने या नव्या राजकीय पिढीचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक ०८ हा श्रीगोंद्यातील जलद गतीने विकसित होणारा भाग मानला जातो. या प्रभागाच्या विकासात्मक गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता, अपेक्षा मखरे यांनी विकास आणि सामाजिक न्याय हे दुहेरी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून उमेदवारीसाठी उत्सुक आहेत.
मुलाखती दरम्यान बोलताना सौ. अपेक्षा म्हणाल्या, प्रभाग क्रमांक ०८ चा विकासात्मक चेहरा बदलणे, मायबाप जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि माझे पती किरण मखरे व वडिलांकडून मिळालेलं सामाजिक चळवळीचं बाळकडू समाजहितासाठी वापरणं हेच माझं ध्येय आहे. पती व वडिलांच्या लढाऊ वृत्तीमुळे मला जनतेच्या न्याय हक्कांसाठी शासन दरबारी भांडण्याची प्रेरणा मिळाली आहे. या उमेदवारीमागे सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आणि जनतेच्या प्रश्नांशी निगडित असलेली चळवळ आहे.
किरण मखरे यांनी गेल्या काही वर्षांत सामान्यांच्या न्यायहक्कांसाठी आंदोलनं, निवेदने, व लोकजागृती मोहिमा राबवून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच धर्तीवर त्यांची पत्नी अपेक्षा यांनी राजकारणातून लोकसेवेचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार केला आहे. सौ. अपेक्षा किरण मखरे या तरुण, सुशिक्षित आणि समाजाभिमुख उमेदवार म्हणून स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ०८ मध्ये उत्सुकता आहे.
यावेळी किरण मखरे म्हणाले, मला स्वतःला राजकारण करायचं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात भारतीय शासक ,’शासनकर्ते न्याय व सुशासनासाठी आणि सर्वसमावेशकतेसाठी बना’, याच विचारातून माझी पत्नी प्रभाग क्रमांक ,०८ मधून सौ अपेक्षा किरण मखरे उमेदवारीसाठी उत्सुक आहे. तिच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचा आवाज नगरपरिषदेत पोहोचेल, असा मला विश्वास आहे.
