राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीगोंदा नगराध्यक्ष पदासाठी सौ ज्योती खेडकर यांनी श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम प्रतिज्ञा करून वचननामा प्रकाशित, केल्याचे नमूद केले.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा शहराच्या नगरपरिषदेची निवडणुक होऊ घातली आहे. आपले हे वैभवशाली शहर विशाल नियोजन, गैरकारभार, भ्रष्टाचार व अकार्यक्षम नेतृत्वामुळे खड्डेमय रस्ते, अशुध्द व अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, दुर्गंधी व कचरा त्यामुळे निर्माण होणारी रोगराई यासारख्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.
अशा सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.श्री. घनःशाम (आण्णा) शेलार, मा.श्री. राजेंद्र दादा नागवडे, मा.आ.श्री. राहुल दादा जगताप, मा. श्री. आण्णासाहेब शेलार, मा.श्री. भगवानराव पाचपुते, मा. श्री. बाळासाहेब नाहाटा व मा.श्री. दत्तात्रय पानसरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित व वारकरी संप्रदायातील सौ. ज्योतीताई सुधीर खेडकर यांना उमेदवारी दिलेली आहे.तसेच नगरसेवकपदासाठी सर्व अधिकृत उमेदवार उभे केले आहेत.
वचननामा
➡️श्रीगोंदा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रसिद्ध करण्यात आलेला वचननामा अमलात आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
➡️बारामतीच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर व हरित शहर बनविण्यासाठी वचनबाद.
➡️शहरासह वाड्यावस्त्यांवर शुद्ध पुरेसे व पूर्ण दाबाने पिण्याचे पाणी देण्यासाठी वचनबांद.
➡️नवीन पक्के रस्ते बांधताना वीज, पाणी, गॅस पाईपलाईन यांची पूर्वव्यवस्था करून रस्त्याचे वारंवार खोदकाम टाळण्यासाठी
➡️शहरातील कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून सेंद्रिय खतांचा प्रकल्प उभारण्यासाठी वचनबद्ध.
➡️योग्य पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था लावून सरस्वती नदी व सेंडी तलाव याचे सुशोभीकरण करण्यासाठी वचनबद्ध.
➡️प्रलंबित व बहुचर्चित लेंडी नाल्यावरील नाना-नानी पार्क विकसित करण्यासाठी वचनबद्ध प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी सुंदर बगीचा व उद्यान उभारण्यासाठी वचनबद्ध.
➡️जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम व मुलांसाठी विविध खेळांची मैदाने उभारण्यासाठी वचनबध्द.
➡️नागरिकांसाठी ग्रंथालय अद्ययावत करून व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी वचनबद्ध
➡️सुशिक्षीत बेरोजगारांची नोंदणी करून रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वचनबद्ध.
➡️व्यापार, उद्योग वाढीसाठी पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध.
➡️विद्युतदाहिनीची व्यवस्था करून स्मशानभूमी तसेच सर्व दफनभूमीमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी वचनबध्द.
➡️अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे व श्रध्दास्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध.
➡️न्यायालयीन निर्णयानंतर सर्व जाती-धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराज यांच्या भव्य संजीवन समाधी मंदिर निर्माणासाठी वचनबद्ध नागरिकांच्या करमणुकीसाठी व विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सर्व सोयींनी युक्त सांस्कृतिक भवन अद्ययावत करण्यासाठी व नाट्यगृह उभारण्यासाठी वचनबद्ध.
➡️शहरातील नागरिकांची कामे त्वरित मार्गी लागावीत व नागरिकांचा सन्मान जपला जावा म्हणून गतिमान व विनम्र प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी वचनबद्ध.
➡️कोणते काम किती खर्च कुठे खर्च हे सर्व व्यवहार जनतेसमोर पारदर्शकपणे ठेवण्यासाठी वचनबद्ध.
➡️शहराचा पुढील ५० वर्षातील विस्तार विचारात घेऊन नियोजनबध्द विकास आराखडा तयार करण्यासाठी वचनबद्ध.
➡️शांत सुरक्षित व भयमुक्त शहरासाठी कटिबद्ध.
🔴🟣🟠🟢
