मनिषा प्रवीणकुमार नाहटा यांच्यावरती कोणतेही आरोप न करता जिल्हा अधिकारी न्यायालयातून काढून टाकण्यात आले.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ३० नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा:मनिषा प्रवीणकुमार नाहटा व ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ यांच्यावरती ग्रामपंचायत विवाद अर्ज लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत कामात अपहार करुन भ्रष्टाचार अनियमितता केलेबाबत आरोप हा संतोष संभाजी गोरखे व दादा गुजाबा मडके यांनी केला होता. विवाद अर्ज ३५/२०२५ मध्ये निर्णय पारित करण्यात आला. याद्वारे प्रस्तुत आदेशाची सूचना देण्यात हि आली. ती पुढील प्रमाणे
आदेश दिलेल्या दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया (भा. प्र. से) यांनी अर्जदार यांचे अर्ज निष्कर्षात नमूद कारणास्तव गुणवत्तेवर काहीएक भाष्य न करता या न्यायालयाचे कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे.व खर्चाबाबत आदेश काढले.
आदेशाच्या सुचना काढण्यात आल्या त्या सूचना खालील प्रमाणे
सूचना व प्रत सर्व संबधितांना देण्यात याव्यात.
एक प्रत तहसिलदार श्रीगोंदा यांचेकडे त्या कार्यवाहीस्तव.. प्रत- गटविकास अधिकारी, श्रीगोंदा, यांचेकडेस माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव. देण्यात आले.