शासकीय कार्यालये बंदची धमकी !
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
१२ ऑगस्ट २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ:
लोणी व्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धमकी देणे, कर्तव्य बजावण्यास अडथळा आणणे तसेच शासकीय कार्यालयांचे कामकाज बंद करण्याची धमकी दिल्याच्या आरोपांप्रकरणी टिळक गोपीनाथ भोस व स्मितल विठ्ठलराव वाबाळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. राव यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश दिला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सी.आर. क्र. ६९३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल असून, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान
प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला
किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम, २०१० मधील कलम ३ व ४ सह इतर संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी लोणी व्यंकनाथ येथे दोन अल्पवयीन मुली पाण्यात पडल्याची घटना घडली होती. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात जमाव जमल्याचे तपासात समोर आले आहे. या जमावाने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटला कुलूप लावल्याचा आरोप आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनाही आत घेऊन
गेटला पुन्हा कुलूप लावल्याचे न्यायालयीन आदेशात नमूद आहे. महिला डॉक्टरांना धमकीबाजी शब्द वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अर्जदारांना यापूर्वी अंतरिम दिलासा देताना ठराविक वेळेत पोलीस ठाण्यात हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तपास अधिकाऱ्याच्या जनरल डायरीतील नोंदीनुसार अर्जदार चौकशीसाठी हजर राहिले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. अर्जदारांनी पोलीस ठाण्यात उपस्थित असल्याचे दाखविणारी छायाचित्रे सादर केली मात्र त्यावर तारीख व वेळ नसल्याने ती ठरलेल्या वेळेतील उपस्थितीचा पुरावा मानता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयास खोटे पुरावे सादर करून पुन्हाही चुकीचं केली जात आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे.
जय घोष जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माता की वंदे मातरम् जय न्याय देवता की
