लिंपणगाव रेल्वे फाटक सिग्नल वाहनांच्या ट्रॅफिकने चक्क १तास चक्काजाम झाले.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा: ३० नोव्हेंबर २०२५ रोजी लिंपणगाव रेल्वे फाटक सिग्नल वाहनांच्या ट्रॅफिकने चक्क १ तास चक्काजाम झाले होते.अपुरी जागा व वाहने आडवी घतल्याने गाड्या एकमेकांना घासत असल्याने वाहने गुंतागुत झाली.वाहतूक नियोजन नसल्या कारणाने वाहनांना हळुवारपणे काढण्यात आले.
रेल्वे फाटक हे अपुरे असल्याने वाहनाची व नागरिकांची तारांबळ उडाली. या रेल्वे फाटक मध्ये दुहेरी वाहतूक कोंडी कायमची झाली असून नागरिकांना कायमच वेळ वाया घालावा लागत असल्याचे स्थानिक व वाहतूक नागरिकांकडून सांगण्यात येत. यात असे रेल्वे सुटायच्या अगोदर २५ मिनिटांत गेट बंद होते त्यात पुन्हा वाहनाची गर्दी वाढते हायवे रोड असल्याने वाहनाची गर्दी जास्त असल्याचे समजते.
नागरिकांना व वाहतूक दाराला किमान ४५ मिनिट खोळंबावे लागते. याच्यावरती रेल्वे स्टेशन दौंड जंक्शन प्रभारी यांनी लिंपणगाव व काष्टी गेट मधील रेल्वे फटकाची रुंदी वाढवावी अशी स्थानिक व वाहतूक नागरिकानाचे म्हणणे आले.
🔴🟠🟢🟣
