गौरी शुगर हिरडगाव युनिटचा दोन लाख मे.टन गाळपाचा टप्पा पार.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ९ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी :- हिरडगाव येथील गौरी शुगर ने चालू गाळपात दोन लाख मेटन गाळपाचा टप्पा पार केला देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले आहे गौरी शुगरचे दहा लाख मे.टन टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या हंगामासाठी गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३१०० रु ने पहिला हप्ता देणार आहे अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली आहे.
बाबुराव बोत्रेपाटील पुढे म्हणाले की गेल्या वर्षी ३१०६ रु नी भाव आणि ऊसाच्या प्रमाणात दिवाळीला मोफत साखर दिली होती
या वर्षी साखर कामगारांना २० टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय घेतला हा आर्थिक भार सहन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन या गळीत हंगामात गौरी शुगर ने पहिला हप्ता ३१०० रु नी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि दिवाळीला १०० रु आणि ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर देण्यात येणार आहे.
कोण किती भाव देतो वा एस किती भाव देणार याचा विचार ओंकार शुगर ग्रुप करत नाही आमची कुणाशीही कसलीच स्पर्धा नाही फक्त शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देता येईल हे धोरण आहे असे बोत्रे पाटील म्हणाले.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गौरी शुगरला ऊस द्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक श्री रोहीदास यादव यांनी केले.
🔴🟢🟠🟣
