श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न.
“श्रीगोंदा शहरात शाळा देते मुलांना व्यावसायिक शिक्षण वर्षातून विक्रेते बनण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांचे साकार”
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार १९ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने दरवर्षी श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री जामदार सर यांनी यावेळी सांगितले.
या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन जेष्ठ नेते तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री घनश्याम अण्णा शेलार यांच्या हस्ते करण्यात आले .
या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते . यात प्रामुख्याने थंड पेय, भाजीपाला ,ओली सुकी भेळ वडापाव , पावभाजी अशा विविध प्रकारच्या स्टॉलने शाळेचे प्रांगण भरुन गेले होते. पालक शिक्षक विद्यार्थी व ग्राहकांनी गर्दी केल्याने स्टॉल वरील विद्यार्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता. स्टॉल वरील पदार्थांची विक्री झाल्याने विद्यार्थी आनंदी होती. या बाल आनंद मेळाव्यासाठी पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमांचे शेवटी विद्यार्थांनी शिक्षक पालक व ग्राहकांचे आभार मानले.
🔴🟢🟠🟣
