शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराज कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार १९ डिसेंबर २०२५
तालुका प्रतिनिधी:-
श्रीगोंदा:रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या वतीने कॉलेजमध्ये श्रीगोंदा तालुकास्तरीय व रयत संकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी 24 व बॅडमिंटन 14 या संघांनी यामध्ये सहभाग घेतला. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी पाचपुते साहेबांनी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व समजून सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. बाबासाहेब भोस यांनी शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार साहेबांविषयी माहिती सांगून खेळाचे महत्व समजून सांगितले.
याप्रसंगी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार सर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव जरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयांमधून राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय खेळाडू संदीप गायकवाड याचा सन्मान करत कॉलेजतर्फे त्याला रोख २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यानंतर बॅडमिंटन व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये विद्याधाम प्रशाला देवदैठण यांनी प्रथम क्रमांक मिळाला तर कोळाई देवी विद्यालय कोळगाव यांनी द्वितीय क्रमांक आणि व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ ने तृतीय क्रमांक मिळवला
17 वर्ष मुलींच्या संघात विद्याधाम प्रशाला देवदैठण यांनी प्रथम क्रमांक मांडवगण निवासी शाळेने द्वितीय क्रमांक तर चिंबळे विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला 19 वर्ष गट मुलांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल चांडगावणे प्रथम महाराजा कॉलेज ने द्वितीय तर छत्रपती महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला 19 वर्षे मुली गटामध्ये महाराज कॉलेज ने प्रथम छत्रपती शिवाजी विद्यालय घोंगरगाव द्वितीय तर विद्याधाम प्रशाला देवदैठण ने तृतीय क्रमांक मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे सर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक रत्नाकर झिटे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दरेकर यांनी केले.
🔴🟢🟠🟣
