ह.भ.प.आबासाहेब नवले यांना आध्यात्मिक आघाडी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पद देण्यात आले.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २८ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी: ह.भ.प.आबासाहेब नवले यांना आध्यात्मिक आघाडी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पद देण्यात आले. या निवड प्रक्रियेत माजी मंत्री बबनरावजी दादा पाचपुते व लाडके आमदार विक्रम सिंह पाचपुते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब युवा नेते प्रताप भैय्या पाचपुते व भाजप श्रीगोंदा तालुका अध्यक्ष डॉक्टर विक्रम भोसले यांच्या नेतृत्वाखाली माझ्या वारकऱ्यांच कलाकार मानधन किर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य शाहीर आसन गोंधळी असेल आराधी असेल विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे त्या त्या क्षेत्रात त्यांना मानधन मिळून देण्यासाठी तसेच अनेक मंदिरांचा विकास झाला पाहिजे त्याकरता माझी निवड आध्यात्मिक आघाडी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष हि केली आहे.
श्रीगोंदा शहरातील व श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावातील वारकरी जोडला गेला पाहिजे व त्यांच्या आर्थिक शैष्णिक तसें दिंडी, वारकरी साहित्य मिळून देण्यासाठी तालुक्याचे लाडके आमदार विक्रम सिंह पाचपुते विधानसभेत वारकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व वारकऱ्यांचे उपस्थिती प्रश्न जाणून घेण्यासाठी वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला हे अध्यक्ष पद मिळाले आहे.
माझी निवड झाल्याबद्दल भाजपाचे ह.भ.प बाळासाहे महाराज महाडिक नागवडे सर माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पंचशीला ताई गिरमकर गणेश रावजी थिटे अशोक रावजी गोधडी व नुकतेच नगराध्यक्ष सुनीताताई संतोषराव खेतमाळीस व तांदळेश्वर भजनी मंडळ बैरागी बाबा भजनी मंडळ नागेश्वर भजनी मंडळ संत शेख मोहम्मद भजनी मंडळ गुरुवर्य तात्या महाराज सेवा मंडळ ओम चैतन्य आत्माराम गिरी ट्रस्ट मांदळी यांनी शुभेच्छा दिल्या.
🔴🟢🟠🟣
