अहिल्यानगर: सिद्धटेक हे श्री गणेश यांचे नाव असलेले गाव आहे. इथे भारत देशातून व देशाच्या बाहेरून पर्यटक व भक्त दर्शनास येतात.अशा या सिद्धटेक गावी भीमा हि नदी वाहते या नदीत पाणी हे सतत वाहत असते नदी पाणी कायम स्वरूपी असते.परिक्रमा घालताना भक्तगण भीमा तीर्थ मध्ये हात पाय धुण्यास जातात. या घाणीने पायऱ्यावरती कचरा व जुनी कपडे पडलेली दिसतात. नदीपात्रात कपडे धुणाऱ्यावर निर्बंध असून सुद्धा
कपडे धुण्याचे ठिकाण बनले जात आहे. हे धोबीघाट मंदिराला व नदीला, घाणीचे कारण बनत आहे सिद्धटेक मधील गोदावरी नदीत कपडे धुतले जातात.नदीतील पाण्याला येतोय घाणीचा थर, साबणाच्या डिटर्जंट आणि इतर रसायनं नदीत मिसळल्याने जलप्रदूषण वाढते, ज्यामुळे नदीचे पाणी दूषित होते, म्हणून या ठिकाणी यावर बंदी घालण्यात आली पाहिजे जल प्रदूषण करणाऱ्यास दंड आकारला जावा.
नदीत कपडे धुण्यास मनाई आहे असे मोठे फलक नदीकाठी लावण्यात यावे.जसे की कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या काठावर दंड आकारतात. फलक लावण्यात आला आहे.नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवल्या जाव्यात. या वरती पर्यावरण पर्यटक विभागाने त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे. या संदर्भात अहमदनगर चे प्रांत यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी हि केली पाहिजे व कार्य स्थळी संबंधित तहसीलदार यांना सूचना देऊन नदीपात्रात घाण करण्यावरती गुन्हे दाखल करावेत.
जल शुद्धीकरण प्रकल्प भीमा नदीवर्ती उभारण्यात यावेत. अशा कारवाई साठी जिल्हा न्यायालयाचे निर्देश काढण्यात यावेत जिल्हा न्यायालयाने सिद्धटेक ठिकाणी स्वच्छतेबाबत भेट व पाहणी करण्याची गरज आहे. या भीमा स्वच्छतेबाबत कायदेशीर कारवाई लवकरात लवकर सुरू करावी.
सूचना,: जिल्हा न्यायालयाने कठोर कारवाईचा नियम अमलात आणावा