नगराध्यक्षा श्रीमती सुनीता खेतमाळीस यांनी पदभार स्वीकारला.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ८ जानेवारी २०२६
श्रीगोंदा माधव बनसुडे :- श्रीगोंदा नगरपरिषदेचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर होऊन १० दिवसांनंतर भाजप च्या नुतन नगराध्यक्षा श्रीमती सुनिता खेतमाळीस व १३ नगरसेवक यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पदभार स्वीकारून नवीन वर्षाची सुरुवात नवी दिशा देऊन केला.
ह.भ.प. भुषण महाराज महापुरुष , ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज रासकर,व ह.भ.प. माऊली महाराज म्हस्के यांचे आशिर्वाद व आदरणीय लोकनेते मा.मंत्री मा.श्री.बबनराव पाचपुते साहेब आ. श्री. विक्रमदादा बबनराव पाचपुते (श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघ),डॉ.सौ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते (अध्यक्षा, परिक्रमा संकुल, काष्टी) यांच्या प्रमख उपस्थितीत शहरातील नागरिक व तालुक्यातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला
यावेळी बोलताना नगराध्यक्षा श्रीमती सुनिता खेतमाळीस म्हणाल्या नगराध्यक्ष पदाची खुर्ची ही सत्तेची नसुन लोकशाही बळकट करण्याची आहे .मी सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा शहराचा विकास करणार आहे.
यावेळी आमदार विक्रम पाचपुते म्हणाले नगराध्यक्ष श्रीमती सुनिता खेतमाळी यांच्यावर श्रीगोंदा शहराची मोठी जबाबदारी असून त्यांच्यावर भाजपची गट नेते पदाची जबाबदारी असल्याने सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन श्रीगोंदा शहराच्या विकासाची कामे करायची आहेत .यासाठी मी निधी कमी पडुन देणार नाही.
यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक सर्व पराभुत उमेदवार पदाधिकारी शहरातील नागरिक तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्र संचालन शहराध्यक्ष धनंजय कोथिंबीरे यांनी तर नगराध्यक्षा श्रीमती सुनिता खेतमाळीस यांनी आभार व्यक्त केले.
🔴🟢🟠🟣
