आपण एक वृक्ष लावू आणि तोच कापू ! मिळाली माहिती तर काम करू अन्यथा तसेच पुढे ढकलू! अधिकारी वर्गाचे झाले दुर्लक्ष गेले १२० वर्षाचे वृक्ष
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार ९ जानेवारी २०२६
श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव काष्टी रोडच्या बाजूने सुरू असलेल्या जाफा कंपनी कडे जाणाऱ्या विजेच्या एक्स्प्रेस लाईनचे सध्या काम सुरू असून सदरील बागल कंट्रक्शन हे करीत आहेत रोडच्या बाजूला असलेल्या चिंच व बाभळीच्या झाडांची विना परवाना वृक्षतोड होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा तसेच वनविभाग यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही वृक्षतोड ताबडतोब थांबवण्यात यावी ग्रामस्थांची मागणी यापूर्वी देखील जाफा कंपनी कडे जाणाऱ्या विजेच्या एक्स्प्रेस लाईनचे काम रस्त्याच्या साईट पट्टीतून अंडरग्राउंड सुरू करण्यात आले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांनी बंद करण्यास लावले होते.
नियम अटी सर्व सामान्य नागरिकांनाच का सार्वजनिक बांधकाम विभागाला होत आहे प्रश्न
सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांनी दिलेल्या परवानानुसार व दिलेल्या १६ अटी शर्तीवर रस्त्याच्या सेंटर पासून १२ ते १५ मीटर अंतरावर विजेची खांब लावण्यात यावे असा परवाना दिला असताना देखील संबंधित ठेकेदार आपला मनमानी कारभार करून तब्बल एकशे वीस वर्षांपूर्वीचे चिंच व बाभळच्या झाडांची कत्तल करून झाडाच्या मधून विजेच्या तारा घेण्यात आल्या असून आत्ता ज्या झाडांची कत्तल केली आहे भविष्यात त्या झाडांची पुन्हा कत्तल करावी लागणार आहे डांबरी रोडच्या एक ते तीन मीटर बाजूला खांब उभे करून एक्सप्रेस लाईनचे सध्या काम सुरू आहे रस्त्याच्या बाजूला असलेले खांब नक्कीच प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची भीती निर्माण होत आहे
संबंधित ठेकेदार व जाफा कंपनी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
🔴🟢🟠🟣
