समर्थ स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धा साठी निवड.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १९ जानेवारी २०२६
श्रीगोंदा :- ३ जानेवारी २०२६रोजी पुणे येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचांलनालय पुणे अंतर्गत शालेय विभागीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी अहिल्यानगर (वाळकी )येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सार्थक भालसिंग, सुभूती भालसिंग, श्रृणवती भालसिंग, वैष्णवी भालसिंग,आरोही काळघुगे यांनी सुवर्ण पदक तर श्रेयस कोल्हे ,संस्कार कोठुळे, प्रतिक्षा भोसले रौप्य पदक वआयुष कोठुळे, कृष्णा भोसले ,रौनक चव्हाण, साहिल सपाटे कांस्य पदक मिळवले. त्यांची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा करीता निवड झाली आहे.
पालकांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडाक्षेत्रातील यशाबद्दल समाधान व्यक्त केले. शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले व शुभेच्छा दिल्या.खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक गौरव घोडके सर तसेच मार्गदर्शक स्वप्नील वारुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
🔴🟢🟠🟣
