महाराजा कॉलेज भदे व शेंडे युनिफाइट खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २४ जानेवारी २०२६
तालुका प्रतिनिधी:दिनांक २३/०१/२०२६ रोजी परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी येथे पार पडलेल्या शालेय विभागीय स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा कॉलेजचे खेळाडू श्रीनाथ भदे ५६ kg व प्रणव शेंडे ६२ kg या दोन खेळाडूंनी आपापल्या वजनगटामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला या दोन्ही खेळाडूंची मुंबई पनवेल येथे ५ ते ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
प्रणव व श्रीनाथ या यशस्वी खेळाडूंचे रयत शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पाठवा, मा. कुंडलीकराव दरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ.सुदाम भुजबळ, डॉ.नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, जिमखाना प्रमुख प्रा.रमेश थोरात व प्रा. श्रीकांत थोरात, कॅप्टन प्रा.ननवरे सर विभाग प्रमुख प्रा रमेश भुजबळ, प्रा उषा बोरुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना कोच चंद्रकांत राहिज सर, क्रीडा शिक्षक संजय डफळ, क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.
