मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तांदळी दुमाला येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न : राजेंद्र भोस
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार, ३० जानेवारी २०२६
आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांचा सहभाग ग्रामविकासाचा कणा असून महिलांच्या एकजुटीमधून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रतिपादन श्रीगोंदा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा अलका सुनील अनभुले यांनी केले.
अध्यक्षस्थान ➡️ अनिता निगडे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अनिता निगडे होत्या. ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर झुंबर खुरांगे राजेन्द्र भोस यांनी कार्यक्रमास अनुमोदन दिले.
आरोग्य तपासणी
यावेळी उपस्थित महिलांना प्लास्टिकमुक्त व बालविवाहमुक्त गाव घडवण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. समाजातील एकल महिलांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कचरा व्यवस्थापन ➡️
या कार्यक्रमात ओला व सुका कचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे यांनी केले. तसेच कार्यक्रमादरम्यान डस्टबिनचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
मार्गदर्शन ➡️
अलका सुनील अनभुले यांनी महिलांना ऑक्सिजनचे महत्त्व, स्वच्छतेचे फायदे व ‘गाव विकास एक उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.
अधिकारी उपस्थिती पाहणी
हा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, श्रीगोंदा गटविकास अधिकारी राणी फराटे तसेच विस्तार अधिकारी सारिका हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
उपस्थित ग्रामस्थ ➡️
:कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य मंगल धालवडे,माजी उप सरपंच महेश भोस, चेअरमन संजय शेळके,लोकनियुक्त सरपंच संजय निगडे, उपसरपंच वैशाली संतोष हराळ, संचालक राम गगाधरे माजी उपसरपंच राजेंद्र भोस, (भाजपा आध्यात्मिक तालुका अध्यक्ष) ह.भ.प. आबा नवले, बबन शेळके, संचालक निलेश शेळके, ग्रामपंचायत कामगार जालिंदर तरटे, महादेव शेळके,व्हा चेअरमन नाना हराळ,बापू शेळके,भरत शेळके, ग्रामपंचायत सदस्य,माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,नवनाथ भोस, झुंबर खुरांगे,पत्रकार तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
संदेश ➡️
महिलांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम तांदळी दुमाला ग्रामविकासासाठी दिशादर्शक ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
🔴🟢🟠🟣
