प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २ मार्च २०२६
स्वरुप व लाभ:घरकुलासाठी रक्कम रु. १.२० लाख अनुदास देय PMFS प्रणाली द्वारे DBT योजनेअंतर्गत वितरीत करण्यात येते. मनरेगा अंतर्गत ९०/९५ मनुष्यबळ मजुरी व स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयासाठी रु. १२,००० प्रोत्साहनपर अनुदास. घरकुलाचे बांधकाम कमीत-कमी २६९ चौ.फु. असावे
पात्रता व निकष:लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या सर्वेक्षणानुसार घरकुलाच्या पात्र (ड) यादीत असणे आवश्यक स्वमालकीची जागा असावी.
निवड प्रक्रिया:प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थ्याची निवड सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या माहितीच्या आधारे प्रतिक्षा यादी तयार केली जाते., या प्रतिक्षा यादीनुसार पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या प्राधान्य क्रमानुसार घरकुलाचा लाभ दिला जातो.
अर्ज कोठे करावा:कसा करावा या बाबत माहिती ग्रामपंचायत कार्यालय संपर्क अधिकारी नाव, क्र. संबधित ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय
रमाई आवास योजना
स्वरुप व लाभ: घरकुलासाठी रक्कम रु. १.२० लाख अनुदान देय PMFS प्रणाली द्वारे DBT योजनेअंतर्गत वितरीत करण्यात येते. मनरेगा अंतर्गत ९०/९५ मनुष्यबळ मजुरी व स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयासाठी रु. १२,००० प्रोत्साहनपर अनुदान. घरकुलाचे बांधकाम कमीत-कमी २६९ चौ.फु. असावे * पात्रता व निकष लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे वास्तव्य रहिवाशी व अनुसुचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा. लाभार्थी हा बेघर किंवा त्याचेकडे पक्के घर नसावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण क्षेत्रासाठी १.२० लाख असावे.
स्वमालकीची जागा असावी.
निवड प्रक्रिया या योजनेअंतर्गत ग्रामिण भागामध्ये अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत करण्यात येते.
अर्ज कोठे करावा:कसा करावा या बाबत माहिती ग्रामपंचायत कार्यालय संपर्क अधिकारी नाव, क्र. संबधित ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय
शबरी आवास योजना
स्वरुप व लाभ घरकुलासाठी रक्कम रू. १.२० लाख अनुदास देय. मनरेगा अंतर्गत ९०/९५ मनुष्यबळ मजुरी व स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयासाठी रु. १२,००० प्रोत्साहनपर अनुदान. घरकुलाचे बांधकाम कमीत-कमी २६९ चौ.फु. असावे
पात्रता व निकष लाभार्थी: हा महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे वास्तव्य रहिवाशी व अनुसुचित जमातीचा असावा. लाभार्थी हा बेघर किंवा त्याचेकडे पक्के घर नसावे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण क्षेत्रासाठी १.२० लाख असावे.
निवड प्रक्रिया: या योजनेअंतर्गत ग्रामिण भागामध्ये अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत करण्यात येते.
अर्ज कोठे करावा:कसा करावा या बाबत माहिती ग्रामपंचायत कार्यालय संपर्क अधिकारी नाव, क्र. संबधित ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय
मोदी आवास योजना
स्वरुप व लाभ घरकुलासाठी रक्कम रु. १.२० लाख अनुदान देय मनरेगा अंतर्गत ९०/९५ मनुष्यबळ मजुरी व स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयासाठी रु. १२,००० प्रोत्साहनपर अनुदान. घरकुलाचे बांधकाम कमीत-कमी २६९ चौ.फु. असावे
पात्रता व निकष लाभार्थी:हा इतरमागा संवर्ग समाजाचा असावा. अन्य योजनेखाली घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.
निवड प्रक्रिया:ज्या इतर मागास संवर्गातील लाभार्थ्याकडे स्वतःची जागा अथवा कच्चे घर आहे. अशा लाभार्थ्यास योजनेचा लाभ घेता येईल. इतर मागास सवंर्गातील विधवा, निराधार व परित्यक्त्या स्त्रियांना प्राधान्यांने लाभ देण्यात येईल. स्वमालकीची जागा असावी.
अर्ज कोठे करावा:कसा करावा या बाबत माहिती ग्रामपंचायत कार्यालय, संपर्क अधिकारी नाव, क्र. संबधित ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय
पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुलांसाठी स्वमालकीची जागा उपलब्ध नसल्यास सदर योजनेतुन जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते,
निकष लाभार्थी प्रतिक्षा यादीत समाविष्ट असावा अथवा घरकुल लाभास पात्र असावा. भूमिहीन असल्यास दाखला, गावठाण हद्दी जागा शिल्लक नसल्याचा दाखला.रक्तातील नात्यात व्यवहार नसावा., ५०० चौ.फु. जागेसाठी अनुदान वितरीत करण्यात येईल.
अनुदान – रक्कम :१००००० च्या मर्यादेत PMFS प्रणाली द्वारे DBT योजनेअंतर्गत वितरीत करण्यात येते.
अर्ज कोठे करावा:कसा करावा या बाबत माहिती ग्रामपंचायत कार्यालय ,संपर्क अधिकारी नाव, क्र. संबधित ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय
माहिती प्रसार करणारे:सदरील योजनेची माहिती श्रीगोंदा पंचायत समितीनी कडून करण्यात आली आहे.
🔴🟢🟠🟣
