काष्टी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या वादातून मारहाण; चेन चोरीचीही तक्रार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
भारत प्रतिनिधी, नाहीद पठाण ( नॅशनल चॅम्पियन)
काष्टी येथील मालक दिपक कृष्णा नागवडे यांच्या पेट्रोल-डिझेल पंपावर सात लिटर डिझेल कारणावरून शेतकरी व पंप कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काही शेतकरी डिझेल खरेदी करण्यासाठी पंपावर आले होते. त्यांनी ड्रम व बॅरलमध्ये डिझेल भरण्याची मागणी केली. मात्र पंप प्रशासनाने लागू नियमांचे पालन करत ड्रममध्ये डिझेल भरण्यास नकार दिला. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्की व मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेदरम्यान पंपावरील चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पंप मालकाने संबंधित व्यक्तींविरोधात मारहाणीसह गळ्यातील सोन्याची चेन चोरी झाल्याची तक्रारही पोलिसांकडे दिल्याचे समजते.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. नेमकी घटना काय घडली, याबाबत तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे.
स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिस प्रशासनाकडून सर्व बाजूंची माहिती घेतली जात आहे.
मजकूर:सर्व गुन्हेगार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी जात धर्म न पाळता कारवाई ही झालीच पाहिजे
कारवाई आदेश हे अहिल्यानगर एस पी आणि अहिल्यानगर सुदर्शन एस पी यांनी कारवाई हि जलद गतीने करावी अन्यथा मी पत्रकार संपादक तसेच पी आय वैभव हराळ कारवाईतील त्रुटीत बदल करून पोलिस कर्मचारी यांच्यावर वयक्तिक कारवाई करेल
अहिल्यानगर मुमक्का सुदर्शन
कारवाई कर जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
🟠🟣🔴🟢
