संत शेख महंमद महाराज मंदिर प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २७ मे २०२६
💎भारत प्रतिनिधी: नाहीद पठाण 💎 (नॅशनल चॅम्पियन)
श्रीगोंदा:संत शेख महंमद महाराज मंदिर संदर्भातील वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मोठे निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्तांना स्पष्ट आदेश दिले असून, विश्वस्तांची बैठक घेऊन वक्फ बोर्डामध्ये करण्यात आलेली नोंदणी पुढील दोन महिन्यांच्या आत रद्द करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे मंदिराच्या मालकी हक्क आणि व्यवस्थापनासंदर्भातील वादाला नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांचे लक्ष आता ट्रस्टकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे लागले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया कशी राबवली जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
🟠🟣🔴🟢
