महाराष्ट्रात जोरदार वारे, मेघगर्जना आणि पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहावे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार, १४ जून २०२६
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज सायंकाळपासून वातावरणात बदल होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ८० ते १०० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वैभव हराळ यांनी व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच शेतीपिके व फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी पाऊस व वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्या मैदानात उभे राहणे टाळावे.
नागरिकांनी हवामान विभागाच्या व पत्रकार वैभव हराळ यांच्या सूचनांवर लक्ष ठेवून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पत्रकार वैभव हराळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
🟠🟢🔴🟣
