प्रतीक पाचपुते यांचे कथित अनधिकृत आधार सेंटर केव्हा बंद होणार? खाजगी जागेतील केंद्राबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी
विश्व निर्माता न्यूज पोर्टल
दि. 12/09/2026
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा : शहरातील प्रतीक पाचपुते यांच्या नावाने सुरू असलेल्या कथित अनधिकृत आधार सेंटरबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित केंद्राला आधार सेवा देण्यासाठी अधिकृत मान्यता आहे का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, आधार सेवा केंद्रासाठी संबंधित जागा, ऑपरेटरची अधिकृत नियुक्ती, परवानगी व इतर आवश्यक निकष पूर्ण आहेत का, याची पडताळणी होणे गरजेचे आहे. खाजगी जागेत आधार सेंटर चालविण्यासाठी कोणत्या अधिकृत परवानग्या व अटी आवश्यक आहेत, तसेच संबंधित केंद्राने त्या अटी पूर्ण केल्या आहेत का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज आहे.
संबंधित केंद्र अनधिकृत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास ते तातडीने बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आधारसारख्या महत्त्वाच्या शासकीय सेवेशी संबंधित केंद्रांच्या कामकाजात पारदर्शकता आणि अधिकृतता असणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून नेमकी काय कारवाई करणार आणि संबंधित केंद्रावर कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
🟠🟡🔵🔴
