दैदिप्यमान यश ! श्रीगोंदा महाविद्यालयाचा १२ वी बोर्ड परीक्षा निकाल ९५.३७%
विज्ञान शाखेची अक्षता आढाव तालुक्यात अव्वल…
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ३ मे २०२६
श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा यांचा १२ वी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून महाविद्यालयाने एकूण ९५.३७% निकालाची कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९७.९३%, वाणिज्य शाखेचा ९३.५१% तर कला शाखेचा ९०.४१% इतका लागला आहे.
या यशात विज्ञान शाखेतील कु. आढाव अक्षता रवींद्र हिने ९१.६७% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत गौरवाची मानली जात आहे. कु. घायाळ पूर्वा बाळासाहेब (९१.००%), कु. राहींज साक्षी भास्कर (८६.८३%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत कु. बोरुडे श्रुती मच्छिंद्र (७६.१७%), कु. निखरट राधा रामकिसन (६८.५०%) व कु. ओहळ तनुजा शत्रुघ्न (६७.३३%) यांनी उत्कृष्ट यश संपादन करत शाखेचे नाव उज्ज्वल केले.
कला शाखेत कु. साबळे वर्षा मारुती (८२.५०%), कु. उदमले प्रतीक्षा खंडू (७९.८३%) व कु. भिसे प्रतीक्षा धनराज (७८.३३%) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. आ. राहुल जगताप, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मा. महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेलं हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
🟣🔴🟢🟠
