MJS कॉलेज मध्ये विभागस्तरीय शालेय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १२ जानेवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी:महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जानेवारी 2026 रोजी शालेय विभागस्तरीय हाफ कीडो बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी पुणे विभागातील सोलापूर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे सर यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर प्रकाश साळवे सर यांनी हाफ किडो बॉक्सिंग खेळाचे महत्व विशद केले. व त्या खेळाचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. ज्युनिअर कॉलेज पर्यवेक्षक प्राध्यापक रत्नाकर झीटे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील तीन खेळाडू सहभागी होते त्यामध्ये आकांक्षा येरकळ द्वितीय क्रमांक, राम दरेकर द्वितीय क्रमांक व प्रथमेश होले याने प्रथम क्रमांक मिळवून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक संजय डफळ, श्री संजय पवार सर यांनी केले.
श्री उमेश शिंदे सर पुणे विभाग प्रमुख ,श्री समीर पांढरकर सर,श्री युवराज पवार सर
शुभम सर सोलापूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्रीकांत थोरात सर, उपप्राचार्य डॉ नितीन थोरात सर डॉ सुदाम भुजबळ सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप दरेकर सर यांनी केले. आभार शब्बीर पठाण सर यांनी केले.
🔴🟢🟠🟣
