तांदळी दुमालातील दिव्यांगांसाठी सोलरकिट वाटप करण्यात आले.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ , अहिल्यानगर
श्रीगोंदा:दिव्यांग निधी’ म्हणजे दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासनाकडून दिला जाणारा आर्थिक निधी, जो विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य, साधने खरेदीसाठी मदत, व्यवसाय कर्जे आणि पेन्शन यांचा समावेश होतो. राज्य सरकार, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थाही दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी खर्च करतात. असा हा निधी तांदळीतील
दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत तांदळी दुमाला मार्फत दिव्यांग निधी ५% व मागासवर्गीय निधी १५% या खर्चातून सोलर पॅनल किट चे वाटप करण्यात आले.यावेळी गावचे सरपंच संजय निगडे, उपसरपंच तुषार धावडे,उपसरपंच हराळ, महेश भोस आदींसह सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
🔴🟢🟣🟠
