आरोपीकडून मिळत असलेल्या धमकीविरोधात शारीरिक शोषण प्रकरणातील पिडीतेचे पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
श्रीगोंदा माधव बनसुडे:- श्रीगोंदा तालुक्यातील एका शारीरिक शोषण पीडित महिलेनं आरोपीकडून ‘केस मागे घे ‘ या बाबत सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
पिडीतेच्या म्हणण्यानुसार, श्रीगोंद्यातील रहिवासी आरोपी अमोल कमलाकर धर्माधिकारी या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन शारीरिक शोषण केल्या मुळे या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि २०।९ ।२०२५ रोजी प्रथम खबर नंबर ०८५३/२०२५ अन्वये, बी एन एस कलम २०२३ अन्वये ६४( २)(m), ६४ ( १) ६९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडितेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की,
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीकडून सतत दबाव आणला जात असून, गुन्हा मागे घेण्यास सांगितले जात आहे. तसे न केल्यास पिस्तूलने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली जात आहे.
तिने पुढे सांगितले की, या सर्व धमक्यांविषयी वारंवार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचे तिला जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर पीडितेने थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदन सादर करून आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध प्रतिबंधक (Preventive) कारवाई करण्या बाबत निवेदन सादर केले असून आपल्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात केली आहे.
