उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त थैलेसिमिया रुग्णांकरिता भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्रीगोंदा :- गोरगरिबांच्या प्रश्नासाठी धावून जाणारा, गोरगरीब जनतेस आपलासा वाटावा असा माणूस म्हणजे श्रीगोंदा नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे यांचा उद्या २ नोव्हेंबर २५ रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी सात वाजता साळवनदेवीचे दर्शन घेऊन शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन, प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये श्री केणे मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर (मेन रोड), श्री संत शेख महंमद महाराज मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री शनी मंदिर, श्री राम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळी विधिवत पूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात येईल.
तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत अहिल्यानगर जिल्ह्यातील थैलेसिमिया बाल रुग्णांसाठी सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने खास या रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नगर येथील जनकल्याण रक्तपेढी ही रुग्णांना दर १५ दिवसाला रक्त भरावे लागते. अशी १५० मुले जनकल्याण रक्तकेंद्राने दत्तक म्हणून घेतलेली आहेत. दिवाळी सणामुळे रक्त केंद्रामध्ये रक्तसाठा खूप कमी झाला आहे त्यामुळे या मुलांना रक्त मिळत नाही या मुलांना जर रक्त मिळाले नाही तर हे स्वतःच आयुष्य जगू शकत नाहीत अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे शनी मंदिर येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरून त्या मुलांचे प्राण वाचावेत आणि एक समाजसेवा आपल्या हातून घडावी ही त्या मागील प्रामाणिक सदभावना आहे.
याच बरोबर श्रीगोंदा येथील नगरपालिकेचे सफाई कर्मचारी जे दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा सन्मान करून त्यांना कपडे वाटप आणि मिठाई वाटप करण्यात येणार आहे.
जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करणारे नानासाहेब कोथिंबिरे यांनी वाढदिवसानिमित्त कुठलाही मोठेपणा न करता समाजाशी बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
तरी गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन माजी उप नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब कोथिंबिरे यांनी केले आहे.
