वाहत्या ट्रक समोर टू व्हिलर अचानक गाडी चालकाचा जीव मुठीत
विश्व निर्माता प्रेस पोर्ट
सोमवार २४ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात दौंड जामखेड रोड, भैरवनाथ मंदिरासमोर एक टू व्हीलर. अचानक ऊस वाहतूक ट्रक समोर अचानक खाली घसरून पडली असता ट्रक चालक याने त्वरित वाहनाचा ब्रेक लावल्याने दोन्ही वाहनामध्ये धडक होऊन ट्रक या वाहनाखाली जाण्यापासून रोखले गेल्याने टू व्हीलर चालकाचा जीव वाचला असे म्हणले तरी चालेल.
श्रीगोंदा शहरातून ऊस वाहतूक होत असल्याने दोन्ही बाजूने रोड वाहता असतो. यात रोड क्रॉसिंग सर्व जागेवरून करता येते म्हणजे दोन्ही रोड मधोमध क्रॉसिंग होऊ नये म्हणून दुभाजक बसविलेले असते. हे दुभाजक श्रीगोंदा शहरात नसल्या कारणाने अशी नागरिकांची पडझड होऊ लागली आहे. सुरक्षा रोड रस्ता यांनी लवकरात लवकर नागरिकांची सुरक्षा मिळण्यासाठी कामे हि जलद गतीने पूर्ण करावे अशी मागणी श्रीगोंद्यातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.