बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते व विज वितरण पुरवठा यांच्या कडे केला धावा.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा:तांदळी टाकळी व कोसेगव्हाण गावात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याने या बिबट्याचे भय शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.शेतकरी शेतीस पाणी देऊ शकत नाही.
वीज हि दिवसा सोडावी रात्रीच्या वेळी बिबट्याचे शिकार शेतकरी होण्याचे भय भेडसावत आहे.तसेच तिन्ही गावातील शेतकरी भयभीत व भीतीदायक वातावरन तयार झाले आहे. तसेच गावात कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून या तिन्ही गावात रात्रीच्या वेळी सुरळीत व अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यात यावा. शेतकऱ्यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते व उप अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आढळगाव यांना निवेदन देऊन विनंती केली निवेदन सादर करणारे कार्यकर्ते व शेतकरी
यावेळी बापूसाहेब शेळके, व्हा चेअरमन तांदळी दुमाला, राजेंद्र भोस उपसरपंच तांदळी दुमाला, युवराज शिंदे कोसेगव्हाण सरपंच , सचिन सुडगे यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी विनंती पूर्वक अर्ज केला.