श्रीगोंदा केसरी पै.इरफान सय्यद यांचा पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
श्रीगोंदा प्रतिनिधी
रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बेलवंडी येथे श्रीगोंदा केसरी कुस्ती मैदान पार पडले यामध्ये श्रीगोंदा तालुका केसरी सामन्यात ओपन गटामध्ये तुषार सोनवणे यांना मात देत इरफान सलीम सय्यद याने मानाची गदा मिळवली पै.इरफान सय्यद यांचे वडील सलीम सय्यद.
यांनी हालाखीची परिस्थिती असतानाही आपल्या मुलाला कुस्ती संकुलनात पाठवले.
बाबाजी कुस्ती संकुलन आष्टी येथे पै.सय्यद चाऊस यांच्याकडे तो सराव करीत आहे 29 नोव्हेंबर रोजी पेडगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पैलवान इरफान सय्यद यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी पेडगाव गावचे सरपंच इरफान पिरजादे, युवराज शिंदे, विनोद मस्के, शोकत हवालदार, सागर जाखडे, शिवाजी खरात, भगवान थिटे, पै नाशिर शेख, सोपान शिंदे, सलीम तांडेल, जुबेर पिरजादे, रवी दिवटे, डॉ शेख, अब्बास भाई शेख,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
