सरकारला बिबटे हवेत का मानस ?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ११ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर:आज बिबट्या हा प्राणी अहिल्यानगर जिल्ह्यात आढळून येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व तहसील फॉरेस्ट,व विज वितरण यांच्याकडे धावा केला आहे.हा प्राणी संख्या वाढवत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात गावो गावी शेतात पिल्ले घेऊन आढळून आला आहे. तो मांसाहारी असल्याने मानवाला पाळीव प्राण्यांना आपले भक्षण करू लागल्याने याची काळजी लागली आहे.शेतकऱ्यांमध्ये भय निर्माण करू लागली. श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना सुरक्षा हि सरकारने दिली पाहिजे का नाही असा प्रश्न नागरिकांकडून होत आहेत.
वांरवार तहसील व वन विभागाकडे अर्ज करून सुद्धा दखल घेण्यात आली नाही. गेले काही वर्ष महिने वावर असताना सांगून बिबट्याला व त्याच्या पिल्लांना न पकडल्याने आज त्यांची संख्य दुप्पट झाली असल्याने मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे सांगण्यात आले.याच्यावरती उपाय योजना हि आपण स्वतः कारवी याला पिंजरा लावणे शक्य होत नाही.व बिबट्याची संख्य हि अहिल्यानगर मध्ये १६ ते १७ ग्रामीण भागात झालेली आहे. वीज हि दिवसा सोडली असता तो दिवसा सुद्धा न घाबरणारा प्राणी आहे.
सुरक्षित राहण्यासाठी उपाय
आपण सर्वांनी शेतात जाळ करणे, टायर मध्ये मिर्ची टाकून धूर करणे तसेच जाड काठी व लोखंडी गज वापरण्याची गरज आहे. समूहाने रहावे, छोट्या मुलांना घरात ठेवावे पाळीव प्राण्यांना सुरक्षित व जाळीच्या आता ठेवण्याची आवश्यकता रानात जाताना बॅटरी,व काठी, रात्रीच्या वेळी घरचे दरवाजे बंद करून घ्यावेत. रात्र होताच बाहेर पडू नये. यांन सारखी काळजी घ्यावी
🔴🟢🟠🟣
