श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड रोडवरचा दुभाजक कोणी खाल्ला आहे जनतेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला टोला.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २३ डिसेंबर २०२५
तालुका प्रतिनिधी:श्रीगोंदा शहरातून ये जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना टू व्हिलर रस्ता पार करण्यासाठी दुसऱ्या बाजूला जाताना दोन्ही रस्त्याच्या मध्यस्थी जी खटकी निर्माण झाली आहे.यात गाडीचा तोल गेल्याने टू व्हिलर चालकाचा अपघात हा कायम स्वरुपी घडत असतो आज भैरवनाथ मंदिरासमोर तर काल एसटी स्टँड च्या परिसरात झाला.
गेले अनेक वर्षे हा रोड बनवून सुरू आहे. यात टू व्हीलर चालकाचा हात फ्याक्चर होतो कधी पायाला ईजा होते तर कधी रक्त स्त्राव होतो.रस्त्यासाठी सुरक्षा कामे ही श्रीगोंदा शहरात करण्यात यावीत अन्यथा अपघात संख्या वाढली जात आहे.हे कायम स्वरूपी घडत असल्याने र नागरिकांना सुरक्षा देणे हि जबाबदारी श्रीगोंदा सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आहे.श्रीगोंदा वाहतुकीला सुरळीत करणे आवश्यक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हि अशी अधुरे ठेवलेली कामे अश्या पद्धतीच्या कामाला नियोजन व दिलेल्या कामाला निधी हा भरपूर असून तो कुडे वापरला जातो ते सांगावे.जर शहरातील रस्त्यावर दुभाजक बसविण्याचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद असून दुभाजक बसविलेले नसतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोंगळा करभार कितपर्यंत योग्य आहे. अश्या कामाने नागरिकांची दुरावस्था निर्माण होत चालली आहे.यात सूचना फलक हे योग्य जागेची निवड करून लावणे व सूचना फलक अगदी कमी प्रमाणात लावण्यात आले आहेत
नवीन इतर व्यक्तीस चौक व रस्त्यावरील देवस्थान याची पाटी लाऊन किंवा शाळेचे नाव हे टाकण्यात यावे जसे की महाराज कॉलेज परिसरात गाडी सावकाश चालवत रहा या अशा सूचना फलक गेले कुठे व रस्ता रोड सुरक्षा कमिटी यांनी सुरक्षतेच्या बाबी समोर आणल्या तर फार चांगले कार्य होईल.अश्या अपघाती घटना टाळल्या जाव्यात व रोडला जरी काँक्रेटिकर आपण केले असले तरी रोड हा सुरक्षतेच्या बाबतीत धोकादायक ठरत आहे.
धार्मिक सामाजिक व राजकीय दृष्टीने श्रीगोंदा शहर नावाजलेले शहर मानले गेले आहे. या शहरासची धार्मिक स्थळ म्हणून नोंद हि केली गेली आहे.अशा शहराला आपण स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वाचे कर्तव्य बजवून पाहिले पाहिजे कोणा अधिकारी व्यक्तीस प्रश्न उपस्थित करून हे काम या श्रीगोंदा तालुक्याचे राजकीय नेते यांनी सहभाग घेऊन हे काम पूर्ण करावे आणि एक समाज सेवक म्हणून अपघात टाळावे या रोडचा दुभाजक कुढे बसविला आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवून दिला पाहिजे.
सूचना:नागरिकांकडून गोळा करून देण्यात आली आहे.
🔴🟢🟠🟣
