बाळूमामा मंदिरासाठी सभामंडपासह रस्ता देण्यात यावा राजेंद्र भोस यांची मागणी प्रताप भैया यांच्याकडे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २४ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी: तांदळी दुमाला येथे श्रीराम वस्तीलगत बाळू मामा मंदिर असून दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असून उन्हाळ्यात व पावसाळ्यात भक्तांचे हाल होतात त्यासाठी त्या ठिकाणी आपल्या स्थानिक विकास निधीतून सभामंडप मिळावा. हि तांदळी दुमाला ग्रामस्थांच्यावतीने विनती बाळूमामा भक्तगणांनी प्रताप भैया यांच्यासमवेत मागणी करताच त्यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या शी बोलता करून ती काही दिवसातच पूर्ण करणार याचबरोबर रस्ता सुद्धा मंजूर करण्यात येणार आहे.
या मंदिरासाठी पंचक्रोशीतील माता भगिनी या बाळूमामाच्या दर्शनास आमस्यानिमित चकरा घालत असतात त्यांना भक्ती हि मिळावी तसेच बाळू मामाचे भक्त वाढावेत म्हणजे वारकरी संप्रदाय बाळूमामा भक्तगण याने संताच्या संस्कृती विचार आचरण हे त्यांची मुले घेतील यातूनच वारकरी संप्रदाय निर्माण होत जाईल. संताचे अभंग भजन दररोज सुरू राहील महाराष्ट्र हा संताची भूमी म्हणून ओळखला जातो येथे अनेक संत होऊन गेले असल्याने या महाराष्ट्रात बाळूमामा हे मेंढर पळणारा संत प्राण्यांवर दया याचना करणारा भगवंत मानला गेल आहे. त्यांनी चमत्कारिक कामे करून भक्ताना प्राण वाचवले आहेत. अश्या या संताची मंदिरे महाराष्ट्रात उभी केली गेली आहेत.
असेच एक मंदिर तांदळी दुमाला येथे निर्माण झाले आहे. या परिसरात कायम या मंदिराची चर्चा चालू असते की या मंदिरास पाऊस वारा उन या मध्ये अनेक भक्तगण चिखलात चलत तीन चार किलोमीटर येतात. म्हणून या करिता मी श्रीगोंदा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा छोटा बंधू असून आम्ही सर्व कुटुंब त्यांच्या सोबत समाजसेवा कृतिशील कामे हि जनतेची करत आलोत. आज मी तांदळी दुमाला या गावापर्यंत येऊन तांदळी दुमाला या गावासाठी विकासकामे पुन्हा एकदा मिळवून देण्याचे आश्वास उपसरपंच राजेंद्र भोस यांना देत आहे.
उपस्थित
निवेदन देताना प्रताप भैय्या यांच्या समवेत तांदळीचे उपसरपंच राजेंद्र भोस चेअरमन बापूसाहेब शेळके पै भरत भोस गोपीनाथ धावडे नवनाथ भोस कोकण गावचे सरपंच सुरेश शेंडगे गणप्रमुख नवनाथ सूर्यवंशी डॉक्टर पीएम भोस सोसायटीचे संचालक बाबासाहेब काळे वाघ व सर्व बाळूमामा भक्त गण उपस्थित होते सर्वांनी युवा नेते प्रताप भैय्या पाचपुते यांचे अभिनंदन केले.
🔴🟢🟠🟣
