दादा बबन दळवी यांचे वयाच्या ६० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ३० डिसेंबर २०२५
श्रीगोंदा: प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील आदरणीय व ज्येष्ठ दादा बबन दळवी यांचे दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता वृद्धापकाळाने शांतपणे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.
अंत्यविधी दुपारी १२ वाजता तांदळी दुमाला येथे पार पडण्यात आला. सर्व तांदळी दुमाला ग्रामस्थ व तांदळी दुमाला वारकरी अंत्यविधीस उपस्थित होते. तांदळीचे सो, सा टी चे संजय शेळके, नेतृत्व सरपंच संजय निगडे, माजी सरपंच देविदास भोस ,नवनाथ भोस ,उप सरपंच राजेंद्र भोस यांनी मयत दादा दळवी यांना आत्मा शांती प्रार्थना केली याच बरोबर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दादा दळवी हे स्वभावाने अत्यंत संयमी, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी कुटुंब, नातेसंबंध आणि मादळी, पंढरपूर वारीतील एक वारकरी,सामाजिक जिव्हाळा जपत व्यतीत केला. गावातील सर्वांनी त्यांना एक आदर्श आणि कर्तव्यदक्ष ज्येष्ठ ज्येष्ठी म्हणून मान दिला होता.
त्यांच्या पश्चात मुलगा महेश दळवी, मंगेश दळवी,पत्नी , दोन मुली, बहीण , असा भक्कम व मोठा परिवार आहे. संपूर्ण दळवी कुटुंबासाठी तसेच त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांचे जाणे अत्यंत दुःखदायक आहे.
निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दळवी कुटुंबियांना सांत्वनपर संदेश दिले आहेत.
🔴🟢🟠🟣
