पेडगाव येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २० डिसेंबर २०२५
श्रीगोंदा : पेडगाव ता. श्रीगोंदा येथील संतोष किसन मोहिते (वय ३५) यांचा आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लिंपणगाव येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानंतर त्यांना तातडीने नगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
🔴🟢🟠🟣
