शेडगाव परिसरात ट्रॅक्टर पलटी होऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १८ जानेवारी २०२६
जिल्हा प्रतिनिधी: सत्यवान शिंदे:
श्रीगोंदा-केशव बाजीराव धेंडे (रा. शेडगाव) हा तरुण रविवार (दि. १८ जानेवारी) सकाळी सुमारास ११.३० वाजता शेती कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेताच्या जवळील रस्त्यावर असलेल्या छोट्या पुलावरून ट्रॅक्टर पलटी झाले या भीषण अपघातात केशव धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
सर्वांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारा, मनमिळाऊ व सामाजिक स्वभावाचा हा तरुण अकाली निघून गेल्याने शेडगाव ग्रामस्थ, तसेच त्याचा मोठा मित्रपरिवार हतबल झाला. गावभर शोककळा पसरली असून त्याच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरारले.
मृत्यूमागे त्याच्या आई, छोटा भाऊ, चुलते, चुलत भाऊ, बहिण, मावशी, मावस भाऊ, मामा असा मोठा परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंतविधी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी शेडगाव येथे झाला.
🔴🟢🟠🟣
