💥महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात शालेय राज्यस्तरीय हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ५ फेब्रुवारी २०२५
तालुका प्रतिनिधी:श्रीगोंदा : महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथे अहिल्यानगर जिल्हा हाफकिडो बॉक्सिंग असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी शालेय राज्यस्तरीय हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील सहा विभागांमधून एकूण १२० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ सुदाम भुजबळ यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. बाबासाहेब भोस होते. यावेळी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे आणि श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनिता खेतमाळीस या प्रमुख मान्यवर उपस्थित होत्या
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. महादेव जरे व प्राचार्य डॉ प्रकाश साळवे यांनी हाफकिडो बॉक्सिंग या खेळाचे महत्त्व, त्याचा इतिहास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धांचे असलेले योगदान स्पष्ट केले.
याप्रसंगी हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्र संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री राज वागतकर सर व हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्रा संघटनेच खजिनदार संतोष बसवंते सर व सचिन पवार सर, पुणे विभाग प्रमुख उमेश शिंदे, समीर पांढरकर, युवराज पवार तसेच सोलापूरचे शुभम सर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिमखाना प्रमुख प्रा. रमेश थोरात थोरात, प्रा. श्रीकांत थोरात, विभाग प्रमुख प्रा रमेश भुजबळ, प्रा उषा बोरुडे, प्रा महेश गिरमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन अहिल्यानगर जिल्हा हाफकिडो बॉक्सिंग सेक्रेटरी शब्बीर पठाण, क्रीडा शिक्षक संजय डफळ, क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांनी केले. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा खेळाडू प्रथमेश होले याने 70 किलो वजन गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले, तर आभार डॉ नितीन थोरात यांनी केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली असून स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.
🔴🟢🟠🟣
