तांदळी दुमाला-कोकणगाव रस्त्याला १० लाखांचा निधी; मा उप सरपंच राजेंद्र भोस प्रयत्नांना यश
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६
💥चिखली रस्त्याच्या समस्येला अखेर कायमचा उपाय, प्रत्यक्ष कामाला सुरुवात💥
तालुका प्रतिनिधी:मा. उपसरपंच राजेंद्र भोस, ग्रामपंचायत सदस्य भरत शेळके व लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे तांदळी दुमाला ते कोकणगाव रस्त्यासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून सुमारे १ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाला आज दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरुवात झाली आहे.
यावेळी उपस्थित बापू शेळके, दादा पाटील, सागर मांढरे, चंद्रशेखर शेळके, खंडू धालवडे, झुंबर खुरांगे, संतोष हराळ, नरसिंग भोस, हनुमंत काळेवाघ, विशाल शेळके, दादा लगड, प्रमोद भोस, अण्णा शेळके, पिनु भोस, पिनु शेळके, शिवाजी शिंदे, प्रसराम काळेवाघ इ.
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर तांदळी दुमाला व कोकणगाव रोड परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण सुलभ होणार आहे.
रस्ता निधी मिळणारे कारण :रस्ता काळ्या मातीचा,पावसाचे, खोल खड्डे, चिखल व पाणी ऊसाचे टेलर व शेतातील वाहतूक अडचणीत
विकासाची माहिती
निधी : १० लाख रुपये अंतर : सुमारे १ किमी तांदळी दुमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर, रोड ग्रामपंचायत नोंद – तांदळी कोकणगाव रोड – तांदळी दक्षिण रोड-रस्ता प्रकार गाडी वाट
उपयोग : ऊस वाहतूक, शेतीसाठी वाहने सध्या : प्रत्यक्ष काम सुरू ग्रामस्थांमध्ये समाधान, अनेक वर्षांची समस्या सुटणार अशी अपेक्षा. पूर्ण झाली.
🔴🟢🟠🟣
