लोणी व्यंकनाथ येथील दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी श्रीगोंद्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा*
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा,27 जुलै 2026
श्रीगोंदा प्रतिनिधी: नाहीद पठाण
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील वीरा आणि आनंदी कांडेकर या दोन लहान मुलांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार डॉ.प्रशांत मुळे व डॉ.शैला डांगे यांच्या वर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (२७ जुलै) श्रीगोंदा येथे सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आंदोलन करण्यात आले आहे.
संबंधित डॉक्टरांनी वेळेत कारणे दाखवून रुग्णवाहिका न पाठवल्यामुळे या दोन बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आणि आंदोलनकर्त्यांवर दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच टिळक भोस व स्मितल वाबळे व इतर 15 प्रामस्थ व्यक्तींवर हेतुपुरस्सर गुन्हे दाखल केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पोलीस उपाधीक्षक मयूर शिरसागर, तेहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित मा. आमदार राहुल दादा जगताप, राजेंद्र दादा नागवडे मनोहर दादा पोटे, राजेंद्र म्हस्के,बाळासाहेब नाहटा, टिळक भोस, स्मितल वाबळे,अनिल ठवाल,जहीर जकाते, अरविंद कापसे, आजी माझी पुढारी,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार,समस्त नागरिक संख्येत उपस्थित होते.
🟠🟡🔵🔴
