दिव्यांगाच्या नोकरीवर डल्ला श्रीगोंदा शहरात चर्चेला उधाण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी / ;– दिव्यांग प्रमाणपत्र हा हक्काचा दस्तऐवज; पण श्रीगोंद्यात तो जुगाडचा पास बनत चालल्याचा गंभीर आरोप होत आहे. प्रत्यक्ष दिव्यांगत्व असलेल्या तरुणांना नोकरीपासून वंचित ठेवले जात असताना, कागदोपत्री दिव्यांग ठरवलेले काहीजण सरकारी नोकरीत आरामात रुजू असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
श्रीगोंद्यात दिव्यांग प्रमाणपत्र आणि राजकीय वशिला असला कि त्याचा घोडा अगदी काशीला असाच प्रकार श्रीगोंद्यात पाहण्यास मिळत असून खरे दिव्यांग बेरोजगार असून बोगस सर्टिफिकेट धारक सरकारी नोकरीत आरामात रुजू आहेत त्यामुळे विश्वसनीय सूत्रांनुसार, काही प्रकरणांत वैद्यकीय तपासणी केवळ कागदांपुरती मर्यादित राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जुनी दिव्यांग प्रमाणपत्रे पुनर्तपासणी अभावी कायम ठेवली गेली, तर दिव्यांग कोट्यातील जागांवर बोगस सर्टिफिकेट धारकांची वर्णी लागल्याचे आरोप नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तब्बल २९ दिव्यांग कार्यरत आहेत त्यातील काहींनी चक्क नाशिक मधून दिव्यांग प्रमाणपत्र आणले आहेत तर काहींनी पुनश्य तपासणीसाठी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे तर काहींच्या वशिल्याने युआयडी मिळविला आहे त्याच्यावर सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी तृतीय-पक्ष वैद्यकीय तपासणी, सर्व प्रमाणपत्रांचा फेरआढावा आणि दोषी आढळल्यास नोकरी रद्द करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे आता प्रशासन न्याय देणार की फाईलांमध्येच प्रश्न गाडणार का ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.प्रशासन जागे होऊन मूळ दिव्यांग बांधवाना न्याय देणार का ?. मात्र यामुळे खऱ्या दिव्यांग उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरत असून, समान संधीच्या घटनात्मक तत्त्वालाच हरताळ फासला जात असल्याची भावना तीव्र होत आहे. “दिव्यांगत्व कागदावर नसतं, आयुष्यावर असतं,” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
महत्त्वाचे: नोकरी व अनुदान सूट आणि आरक्षण मिळविण्यासाठी बोगस व नकली प्रमाणपत्र देणारे वैद्यकीय अधिकारी सत्यतेत असणारे अपंग व्यक्तीसाठी अपंग कोठा संपवत आहेत.अपंग कोठा चोरी करणारे वैद्यकीय अधिकारी
🔴🟢🟠🟣
