💥शासनाच्या अनुदान घोषणा ठरल्या शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणाच; आर्थिक अडचणींचा विळखा कायम💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १ मार्च २०२६
💥आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना अनुदान प्रकरणी विशेष लक्ष घालण्याची गरज: शेतकऱ्यांची मागणी 💥
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी विकास योजने अंतर्गत ३५ कोटी अनुदान रुपये थकीत ठेवले आहे. शासनाने शेती व अवजारे, ठिबक सिंचन, फवारणी यंत्रे, तुषार सिंचन, विकास योजना सुरू असून अनुदान फॉर्म भरून घेतले आहेत. पण अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा नाही.
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक लोन घेऊन शेती मध्ये गुंतवणूक केली मात्र अनुदान रक्कम न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्या मुळे श्रीगोंदा विधान सभा २२६ चे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी कृषी प्रशासनाकडे अनुदान अद्याप का मिळाले नाही.शासन अनुदान मिळण्याबाबत घोषणा करते परंतु शेतकऱ्यांना अनुदान काहीना पूर्ण , तर काहीना अर्धवट, काही घोषणा बोगस आणि प्रत्येक्षेच्या असतात.
शासनाने केलेली अनुदान घोषणा शेतकऱ्यांला आर्थिक गुंतागुंतीची ठरली.
याबाबत माहिती मिळवावी अशी मागणी श्रीगोंदा शेतकरी करत आहेत. कृषी अधिकारी यांना अनुदानबाबत ठोस माहिती शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. सरकार अनुदान देण्याच्या घोषणा मोठ्याने करते तर अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहच होतच नाहीत असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून करण्यात आला.
शेतकऱ्यांची गुंतवणूक आली अडचणीत
शासनाकडून अनुदान मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा अद्याप केलेले नाही.शासन अनुदान रक्कम विलंब करत चालले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून बँक कर्ज हफ्ते थकत आहेत. शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीसा दिल्या जात आहेत. आर्थिक ताण वाढत चालला आहे.
श्रीगोंदा कृषी कार्यालयाकडून एकच उत्तर वारंवार
शेतकरी संघटना कडून कृषी विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु तालुका कृषी कार्यालयाकडून प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविला आहे वारंवार सांगण्यात येत आहे. तरी निधी अभावी वितरण रखडल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे काय
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने योजना जाहीर करताना वेळेवर अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत अनुदान मिळत नाही तर कितेक महिने रखडून धरले आहे. अनुदान रक्कम प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुक्यातील शेतकरी संघटनांनी व आमदार विक्रम सिंह पाचपुते यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून कृषी विभागाशी पाठ पुरावा करावा. अशी मागणी होत आहे. शासन स्थरावर निधी उपलब्ध करून देऊन प्रलंबित ३५ कोटी रुपयांचे अनुदान त्वरित वितरित करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल
🔴🟢🟠🟣
